January 22, 2025 7:51 PM

views 17

रणजी ट्रॉफी : नाशिकमध्ये उद्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या संघादरम्यान सामना

नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या दोन संघांदरम्यान रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रथमच हा सामना होत आहे. २०१८ नंतर प्रथमच नाशिकमध्ये रणजीचा सामना होत असून तो २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत असून बडोद्यााचा संघ  कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.  

January 5, 2025 8:33 PM

views 14

दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेसाठी १७ दिव्यांग खेळाडूंची निवड

श्रीलंकेत होणार असलेल्या दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेकरता भारतीय निवड समितीनं आज १७ दिव्यांग खेळाडूंची निवड केली असून संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी विक्रांत रवींद्र केणीवर सोपवली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना १२ जानेवारीला भारत आणि पाकिस्तान या दोन संघात रंगणार असून अखेरचा सामना २१ जानेवारीला होणार आहे. दूरदर्शनवर या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. 

December 29, 2024 3:59 PM

views 20

मेलबर्न कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १०५ धावांची आघाडी मिळवली होती, त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली आहे. शतकवीर नितेश रेड्डी ११४ धावांवर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानं भारताचा पहिला डाव ३६९ धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फल...

December 23, 2024 1:11 PM

views 43

एकदिवसीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा स्मृती मंधानाचा विक्रम

महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृती मंधानानं नोंदवला आहे. काल वडोदरामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर झालेल्या सामन्यात स्मृतीनं ९१ धावा केल्यामुळे तिनं या वर्षी केलेल्या धावांची संख्या १ हजार ६०२ झाली आहे. त्यामुळे स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्टचा एक हजार ५९३ धावांचा विक्रम मोडला आहे.

December 18, 2024 2:52 PM

views 15

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्यानं आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या सामन्यात त्यानं ५३ धावांत १ गडी बाद केला. हाच त्याच्या कारकिर्दीतला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना ठरला. ६ नोव्हेंबर २०११ रोजी वेस्ट इंडिजविरोधात दि...

December 16, 2024 3:35 PM

views 15

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि के एल राहुल खेळत असून पावसामुळे खेळाचा काही वेळ वाया गेला. 

December 10, 2024 10:49 AM

views 10

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय

श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताच्या संघानं श्रीलंकेवर पाच-शून्य असं वर्चस्व राखलं आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या शेवटच्या थरारक सामन्यात भारताच्या संघानं तेरा धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला. संतोषकुमार या मालिकेत एकंदर 325 धावा नोंदवून सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. बारा खेळाडू बाद करणारा श्रीलंकेचा ऍलनरोज कालेप मालिकावीर ठरला.

December 8, 2024 3:41 PM

views 19

U१९ आशिया चषक : अंतिम सामन्यात बांग्लादेशाचं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण संघ १९८ धावांतच तंबूत धाडला. बांग्लादेशाच्या वतीनं मोहम्मद रिझान यानं सर्वाधिक ४७ धावा केल्या. भारताच्या युद्धजीत, चेतन आणि हार्दिक यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारता...

December 7, 2024 7:27 PM

views 23

बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची भारतावर १५७ धावांची आघाडी

बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली आहे. आज दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात ५ बाद १२८धावा झाल्या होत्या.     पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत १-०नं पुढे आहे. पर्थ इथं झालेल्या पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा विजय मिळवला होता.

December 5, 2024 1:35 PM

views 12

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारतीय फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. भारताच्या हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना फारशी चमक न दाखवता माघारी परतल्या. त्यामुळे भारतीय संघ ३४ षटकांत सर्वबाद १०० धावा करू शकला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सलामीची फलंदाज फिबी लिचफिल्ड ३५ धावा काढून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच...