September 30, 2025 9:15 PM September 30, 2025 9:15 PM

views 742

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं श्रीलंकेपुढे २७० धावांचं आव्हान

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. गुवाहाटी इथं सुरु असलेल्या, या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं  श्रीलंकेपुढं विजयासाठी २७० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे हा सामना ४७ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकातच स्मृती मंधाना ८ धावांवर बाद झाली. प्रतिका रावल ३७, तर हरलीन देओल ४८ धावा करुन बाद झाल्या. कर्णधार हरमनप्रित कौर २१, तर जेमिमा रॉड्रिग्ज शून्य, तर रिचा घोष २ धावा करुन तंबू...