October 6, 2024 7:22 PM October 6, 2024 7:22 PM

views 12

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचं भारतासमोर १०६ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारतासमोर १०६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानकडून निदा दार हिने सर्वाधिक २८ धाावा केल्या. भारताच्या अरुंधती रेड्डी हिने तीन, श्रेयांका पाटील हिने दोन तर रेणुका ठाकुर सिंह, दिप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.   शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बळीच्या बदल्यात ६१ धावा झाल्या होत्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांग्लादेश यांच्यादरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला टी ट...

July 18, 2024 5:34 PM July 18, 2024 5:34 PM

views 11

आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट जागतिक मानांकनं जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने यंदाची पुरुष टी ट्वेंटी ची क्रमवारी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ नं टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे. फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे, तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाड क्रमवारीत एका क्रमांकानं घसरून आठव्या स्थानावर आला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत, हार्दिक पंड्या हा टॉप टेन मधला एकमेव भारतीय खेळाडू आहे, तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा यानं आपलं...

June 26, 2024 11:10 AM June 26, 2024 11:10 AM

views 22

टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी 6 वाजता त्रिनिदादमध्ये तारौबा इथं होणार आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामनाही उद्याच गयाना इथं रात्री 8 वाजता होणार आहे. अंतिम सामना शनिवारी बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन इथं खेळला जाईल.

June 19, 2024 2:50 PM June 19, 2024 2:50 PM

views 23

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ फेरीचे सामने रंगणार

आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर आठ संघांमधले सामने सुरू होणार आहेत. हे सर्व सामने वेस्ट इंडिज मध्ये खेळले जाणार आहे. यातला पहिला सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांदरम्यान खेळला जाणार आहे. सुपर आठ फेरीतला भारताचा पहिला सामना उद्या अफगाणिस्तान बरोबर होणार आहे. बांगलादेशने सर्वात शेवटी नेपाळवर विजय मिळवून सुपर आठ मधे प्रवेश केला आहे.