October 10, 2024 8:55 AM

views 21

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर काल दुबई इथं 82 धावांनी विजय मिळवून एक विक्रम केला. त्यामुळं अ गटात भारत क्रमवारी आणि धावसंख्येच्या प्रमाणात वरचढ ठरला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धना यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतानं केलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ विसाव्या षटकात सर्वबाद 90 धावा करु शकला.  

October 1, 2024 2:45 PM

views 16

महिला टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वसराव सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंका विजयी

महिला टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वसराव सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंकेला विजय प्राप्त झाला आहे. बांग्लादेशनं पाकिस्तानला १४० धावांचं लक्ष्य दिलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११७ धावाच करू शकला. श्रीलंकेनं स्कॉटलंडला ५ गडी राखून पराभूत केलं. स्कॉटलंडनं प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत केवळ ५९ धावा केल्या. श्रीलंकेनं ५ गड्यांच्या मोबदल्यात १५ षटकं आणि ३ चेंडूंमध्ये ही धावसंख्या पूर्ण केली.  

August 2, 2024 11:14 AM

views 19

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलंबोमध्ये होणार

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबोमध्ये होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या २० षटकांच्या क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर ही मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजतासामना सुरू होईल.

July 14, 2024 3:36 PM

views 15

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय

क्रिकेटमध्ये बर्मिंघम इथं झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातले दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.   पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५६ धावा केल्या. भारताने फक्त १९ षटकांत १५९ धावा करत सामना जिंकला.   युवराज सिंह याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून अंबाती रायडू, गुरकिरत सिंह, युसूफ पठाण यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

June 30, 2024 1:33 PM

views 24

T20 क्रिकेट विश्वचषक १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली या शहरांसह जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजरा केला.  भारतीय क्रिकेट संघाच्या या कामगिरीनं देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचं हृदय जिंकलं अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण स्पर्ध...