January 11, 2026 6:26 PM

views 105

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला सामना वडोदरामध्ये सुरु

भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यबझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३०० धावा केल्या. डेरिल मिशेलनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. डेवोन कॉनव्हेनं ५६ तर हेन्री निकोल्सनं ६२ धावांचं योगदान दिलं.  भारतातर्फे मोहमद सिराज, हर्षीत राणा, आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी...

January 6, 2026 1:30 PM

views 29

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निवडणुकी संदर्भात न्यायालयात विविध याचिका दाखल असून त्यावरची सुनावणी होईपर्यंत निवडणूक घेऊ नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. क्रिकेटपटू केदार जाधव, तसंच सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि इतक काही याचिकाकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर या निवडणुकीला आव्हान दिलं आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान होणार होतं. 

January 3, 2026 2:03 PM

views 20

भारत आणि बांगलादेश यांच्यातली नियोजित क्रिकेट मालिका सप्टेंबरमध्ये रंगणार

भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या वर्षी नियोजित असलेली मर्यादित षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका यावर्षी सप्टेंबर महिन्यात होईल, असं बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितलं आहे. मात्र याचं वेळापत्रक निश्चित नाही. गेल्यावर्षी बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचारानंतर प्रधानमंत्री शेख हसिना भारतात आल्या, त्यानंतर दोन्ही देशा दरम्यान तणाव वाढला. दोन्ही देशांनी परस्परांच्या उच्चायुक्तांकडे परस्परांच्या देशातल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. या परिस्थितीमुळे दोन्ही देशां दरम्यान होणारी क्रिकेट मालिका ...

December 29, 2025 2:33 PM

views 18

न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता. आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला. ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२३ मध्ये तो न्यूजीलंडसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले. २०११ मध्ये होबार्ट कसोटीत त्याने फक्त ६० धावा देऊन ९गडी ब...

December 20, 2025 7:17 PM

views 1.3K

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा संघ जाहीर

आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं असून उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे असेल. या संघाची घोषणा आज बीसीसीआयनं केली. इशान किशन आणि रिंकू सिंह यांनी संघात पुनरागमन केलं आहे. सलामीचे फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची नावं नक्की झालं आहे. याशिवाय, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. शुभमन गिल याला दुखापतीच्य...

December 20, 2025 2:56 PM

views 51

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध T20 क्रिकेट मालिकेत भारत विजयी

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं ३-१ अशी जिंकली. अहमदाबाद इथं काल झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेवर ३० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघानं २० षटकांत २३१ धावा केल्या. तिलक वर्मानं ७३ तर हार्दिक पांड्यानं ६३ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं केवळ १६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. विजयासाठी आवश्यक २३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत २०१ धावा करू शकला. वरुण चक्रवर्तीनं पाहुण्या संघाचे चार फलंदाज बाद केले. हार्दिक पांड्या सामना...

December 12, 2025 10:46 AM

views 23

वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

चंदीगड इथं काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांच्या 4 बाद 213 धावा झाल्या. उत्तरादाखल भारतीय संघ सर्वबाद 162 धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्या 14 डिसेंबरला धरमशाला इथं होणार आहे.   दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेच्या 19 वर्षांखालील आशिया कप 2025 ला आज दुबईमध्ये सुरू होत आहे. आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखालील भारत आणि यजमान संयुक्त अरब अमिर...

December 11, 2025 3:04 PM

views 64

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार

क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार आहे.   संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-०नं आघाडीवर आहे.

December 10, 2025 9:57 AM

views 32

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील कटक मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात, भारतानं काल दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी पराभूत केलं.   भारतानं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 74 धावांमध्ये गारद झाला. हार्दिक पांड्या 28 चेंडूत 59 धावा करून सामनावीर ठरला. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना येत्या गुरुवारी चंदीगड इथं खेळला जाणार आहे.

December 9, 2025 9:25 AM

views 26

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि दक्षिणआफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबती मैदानावर खेळण्यात येणार आहे.   यामालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगडमधील मुल्लानपूर इथं तर तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा सामना लखनऊमध्ये आणि शेवटचा सामना अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी मैदानावर होईल.