September 8, 2024 3:25 PM September 8, 2024 3:25 PM

views 8

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नाशिक जिल्ह्याला भेट देणार

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या नाशिक जिल्ह्याला भेट देणार आहेत. उद्या सकाळी ते ओझर इथं पोहोचोतील, यानंतर ते शासकीय विश्रामगृहात नाशिक जिल्ह्यातले खासदार आणि आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या विविध यंत्रणांची आढावा बैठकही ते घेणार आहेत. यासोबतच उद्या दुपारी ते राजकीय पक्षांचे नाशिकमधले पदाधिकारी, संघटना प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील तज्ञांसोबतही संवाद साधणार आहेत.  

August 10, 2024 7:14 PM August 10, 2024 7:14 PM

views 5

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पानंतर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १० पूर्णांक ६४ शतांश टीएमसी पाणी वापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातल्या ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. ७ हजार १५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टिने हे आणखी...

July 31, 2024 6:56 PM July 31, 2024 6:56 PM

views 10

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात आयोजित समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजीत पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचं स्वागत केलं.   सी. पी. राधाकृष्णन याआधी झारखंडचे राज्यपाल होते. तमिळनाडूमधे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडू...