June 27, 2025 6:30 PM June 27, 2025 6:30 PM
12
सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना, निश्चित उद्दिष्ट या त्रिसूत्रीच्या आधारावर यश संपादन करता येतं-राज्यपाल
सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दिष्ट या त्रिसूत्रीच्या आधारावर यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. ते आज पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र. कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रामकृष्णन रामन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात २२ देशातील ८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.