November 17, 2025 3:13 PM November 17, 2025 3:13 PM

views 13

प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं- उपराष्ट्रपती

प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे.  हैदराबाद इथं रामोजी एक्सलन्स अवॉर्ड २०२५ च्या उद्धाटन सोहळ्यात ते काल बोलत होते. आजच्या डिजिटल युगात चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्यात पल्लवी घोष यांना यशस्वी महिला म्हणून गौरवण्यात आलं. सतुपती प्रसन्ना श्री यांना कला आणि संस्कृती, आकाश तंडन यांना मानवतेसाठी सेवा, जयदीप हार्डीकर यांना पत्रकारिता,...

November 16, 2025 7:43 PM November 16, 2025 7:43 PM

views 17

पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवते – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं  ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवतो, असं ते यावेळी म्हणाले. अमली पदार्थांपासून  मुक्त जबाबदार समाज घडवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात माध्यमांचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात राधाकृष्णन यांनी केंद्रीय पर्यटन तसंच...

October 2, 2025 1:32 PM October 2, 2025 1:32 PM

views 22

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना अभिवादन केलं. शास्त्रीजींचं आयुष्य साधेपणा, प्रामाणिपणा आणि नैतिक धैर्याचं उत्तम उदाहरण होतं, वैयक्तिक आयुष्याशिवाय देशाहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून अनेक पिढ्यांना मिळाली असं राधाकृष्णन म्हणाले. शास्त्रीजींची जय जवान जय किसान ही घोषणा देशाच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान असलेल्या या दोन घटकांमधले अविभाज्य बंध दर्शवते असं ते म्हणाले.

September 12, 2025 1:42 PM September 12, 2025 1:42 PM

views 2.7K

देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली शपथ

देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम वेंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती, तसंच अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, जे.पी.नड्डा, पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.  उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन य...

September 12, 2025 9:24 AM September 12, 2025 9:24 AM

views 69

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे. दरम्यान नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पद आणि गोपनीयतेची शपत घेणार आहेत.

August 18, 2025 7:46 PM August 18, 2025 7:46 PM

views 7

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले. तिथं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदीच्छा भेट घेतली.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे....

August 18, 2025 2:50 PM August 18, 2025 2:50 PM

views 3

रालोआकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल दिल्लीला रवाना

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे.   तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्यपालांची सदिच...

August 18, 2025 10:22 AM August 18, 2025 10:22 AM

views 7

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रधानमंत्र्यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) निर्णयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदींनी सार्वजनिक जीवनात त्यांच्या दीर्घ काळात, श्री. राधाकृष्णन यांनी त्यांच्या समर्पण, नम्रता आणि बुद्धिमत्तेद्वारे स्वतःचे वेगळेपण दाखवले आहे. राधाकृष्णन यांनी विविध पदांवर काम करताना नेहमीच सामुदायिक सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचसोबत राधाक...

July 22, 2025 7:36 PM July 22, 2025 7:36 PM

views 42

“ऑपरेशन सद्भावना” हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा-राज्यपाल

भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडचा  "ऑपरेशन सद्भावना" हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा आहे. असा विश्वास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.  मुंबईतल्या राजभवन इथं  "ऑपरेशन सद्भावना" उपक्रमांतर्गत आयोजित नॅशनल इंटीग्रेशन टूर अंतर्गत सिक्कीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबर राज्यपालांनी संवाद साधला.  त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमात सिक्कीम मधील युवक-युवतींच्या सक्रिय सहभागामुळे देशाच्या समावेशक आणि ऐक्यपूर्ण  भविष्यासाठी नवसंजीवनी मिळेल असंही ते यावेळी म्हणाले.

July 7, 2025 7:45 PM July 7, 2025 7:45 PM

views 11

अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करण्याची राज्यपालांची सूचना

महाराष्ट्रानं दूध उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त आज राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  सहकार यशस्वी झाला तरच विकास सर्वसमावेशक होईल, असंही ते म्हणाले.