July 2, 2025 1:57 PM July 2, 2025 1:57 PM

views 3

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष-भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाणात साईड इफेक्ट्स असल्याचं या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या काळात, वरकरणी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींच्या अचानक झालेल्या मृत्युंबाबत केलेल्या संशोधनातून, ...

August 23, 2024 1:20 PM August 23, 2024 1:20 PM

views 5

सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला अमेरिकेची परवानगी

अमेरिकेने सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. सध्या आढळत असलेल्या कोविड उपप्रकाराच्या  प्रतिकारासाठी  ही लस अधिक सक्षम आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत १२ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्यासाठी या लशीच्या  तात्काळ वापरासाठी परवानगी दिली आहे. मॉडर्ना आणि फायझर बायो एन टेक या लशींचा वापरही ६ महिने ते ११ वर्षे वय असणाऱ्यांवर करता येईल असं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.