May 10, 2025 8:42 PM May 10, 2025 8:42 PM

views 11

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्णय

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.   भविष्यात कुरापाती काढल्यास ऑपरेशन सिंदूर सारखं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. 

March 15, 2025 2:24 PM March 15, 2025 2:24 PM

views 7

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे पारा घसरला, तर महाराष्ट्रात तापमानात वाढ

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे तर महाराष्ट्रात तापमानानं उच्चांक गाठला आहे. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काल संध्याकाळपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत असून हवामान खात्यानं ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढच्या काही दिवसात अनेक भागात अधूनमधून पाऊस आणि हिमवृष्टी होईल. सोमवार पासून खोऱ्यातलं हवामान स्थिर होणार असून येत्या २४ मार्च पर्यंत परिसरातलं हवामान कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. श्रीनगर मध्ये देखील आज हिमवृष्टी होणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम ...

January 7, 2025 9:07 AM January 7, 2025 9:07 AM

views 11

देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण

देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.   कर्नाटकात आढळलेल्या तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात. या आजाराचा वि...

January 4, 2025 1:40 PM January 4, 2025 1:40 PM

views 4

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३ – २४ या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात निष्कर्ष

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ५ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. हे प्रमाण २०११-२०१२ या आर्थिक वर्षात जवळपास २७ टक्के इतकं होतं. भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाणही १३ पूर्णांक ७ शतांश टक्क्यांवरून ४ पूर्णांक ९ शतांश टक्क्यांवर आलं आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीत झालेली वाढ आणि सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे ग्रामीण भागातल्या दारिद्र्याच्या प्रमाणात ही मोठी घट झाल्याचं अहवालातून द...

November 29, 2024 8:22 PM November 29, 2024 8:22 PM

views 8

गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ

गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती, वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रमुख ८ उद्योगांमधे उत्पादन ४ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढलं. त्यात कोळसा, तेलशुद्धिकरण, पोलाद, सिमेंट, वीज आणि खतं यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोळसा उद्योगात ७ पूर्णांक ८ दशांश, तेलशुद्धिकरण ५ पूर्णांक २ दशांश, स्टील मधे ४ पूर्णांक २ दशांश, सिमेंट ३ पूर्णांक ३ दशांश तर वीज निर्मिती उद्योगाच्या उत्पादनात ६ दशांश...

November 12, 2024 2:34 PM November 12, 2024 2:34 PM

views 12

देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्याची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते १० नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या कॉर्पोरेट कर संकलनात चार लाख ७९ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत पाच लाख १० हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे.

September 1, 2024 1:42 PM September 1, 2024 1:42 PM

views 4

राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात

राष्ट्रीय पोषण सप्ताह आजपासून देशभरात सुरू होत आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे सन १९८२पासून दरवर्षी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो. पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या सप्ताहादरम्यान भर दिला जातो. या कालावधी...