October 9, 2025 1:30 PM October 9, 2025 1:30 PM
39
खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक
खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी ही कारवाई केली. या औषधाच्या सेवनामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानातल्या अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तपास अधिकाऱ्यांनी श्रीशन फार्मा या औषध कंपनीच्या कारखान्यावर छापे टाकून काही नमुने आणि कागदपत्रं ताब्यात घेतली असून कारखाना सील केला आहे.