August 14, 2025 3:56 PM August 14, 2025 3:56 PM

views 2

मुंबई किनारी रस्ता उद्यापासून २४ तास खुला राहणार

मुंबईचा किनारी रस्ता उद्यापासून २४ तास वाहतुकीसाठी खुला असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबई किनारी रस्त्यावरचं विहार क्षेत्र आणि चार पादचारी भुयारी मार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. वाहतुकीच्या नियमांचं पालन करून या रस्त्याचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. आज लोकार्पण केलेले प्रकल्प हे फक्त काँक्रीट, स्टील आणि तंत्रज्ञानाची कमाल नसून मुंबईच्या भविष्याची गती, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित...