November 10, 2025 1:19 PM

views 37

सहकारिता महाकुंभ २०२५ या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

देशातल्या दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षांत किमान एक नागरी सहकारी बँक असली पाहिजे, असं उद्दिष्ट ठेवावं, असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ २०२५ या, शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.   या दोन दिवसीय परिषदेत धोरण, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर सखोल मंथन व्हावं आणि परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध होणाऱ्या दिल्ली घोषणापत्रात सहकार क्षेत्रासमोरच्या अडचणी सोडव...