July 11, 2025 8:14 PM July 11, 2025 8:14 PM

views 14

मुदखेडमध्ये  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ

नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या जवानांना विशेष पारीतोषिक देऊन गौरवण्यात आलं तसच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली. अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

November 29, 2024 7:24 PM November 29, 2024 7:24 PM

views 10

नाशिकच्या ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा

नाशिक रोड इथल्या कॅट अर्थात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधले विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षान्त समारंभ आज सकाळी झाला. या प्रसंगी शानदार संचलन करत वैमानिकांच्या तुकडीनं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. चित्ता, चेतक, ध्रुव या लष्करी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं यावेळी झाली. कॅटच्या या दीक्षांत समारंभादरम्यान नेपाळ, नायजेरिया तसंच भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसह ४ महिला अधिकाऱ्यांनीही हेलिकॉप्टर पायलटची पदवी प्राप्त केली.

August 31, 2024 3:32 PM August 31, 2024 3:32 PM

views 11

धुळे पोलीस दलात नवीन भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींंचा दिक्षांत सोहळा

धुळे पोलीस दलात नवीन भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींंचा दिक्षांत सोहळा आज सकाळी झाला. धुळ्याच्या कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरिक्षकांनी पोलीस प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक दिलं. उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा त्यांनी यावेळी सत्कार केला. यावेशी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उपवनसंरक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे, राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक आणि अन्य मान्यवर  उपस्थित होते.