March 15, 2025 3:30 PM

views 33

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम

सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊ या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर, मुदत संपण्याची तारीख, वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती...