November 27, 2025 1:16 PM November 27, 2025 1:16 PM

views 55

युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण

पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात काल संविधान दिनानिमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये अभिमान व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संकल्पनांनी अगणित लोकांच्या जीवनात शक्ती आणि आशा निर्माण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

November 26, 2025 12:51 PM November 26, 2025 12:51 PM

views 132

संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे. "हमारा संविधान - हमारा स्वाभिमान" ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभेचे सभापती ओम बिरला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यसभेतले सभागृह नेते जेपी नड्डा, तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आणि संसद सदस्य सहभागी झाले होते. राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं...

November 25, 2025 7:34 PM November 25, 2025 7:34 PM

views 29

नवी दिल्लीत उद्या संविधान दिनाचा कार्यक्रम होणार

संविधान दिनाच्या निमित्तानं उद्या नवी दिल्लीत संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. भारतानं १९४९ साली याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात सहभागी होतील. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाईल. तसंच संविधानाच्या ९ विविध भारतीय भाषांमधल्या प्रतींचं आणि एका विश...

November 26, 2024 7:42 PM November 26, 2024 7:42 PM

views 12

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक – प्रधानमंत्री

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे. गेल्या ७५ वर्षात देशापुढं जी जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला. या काळात आणीबाणीसारखे प्रसंग आले, त्यांनाही संविधान सामोरं गेलं. आज जम्मू-कश्मीरमधेही स...

November 26, 2024 7:45 PM November 26, 2024 7:45 PM

views 11

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम

भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला. ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध  कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०१५ ला सरकारने घेतला. देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच संविधानाच्या उद्देशिकेचं जाहीर वाचन करण्यात येत आहे. आक...

November 25, 2024 8:01 PM November 25, 2024 8:01 PM

views 167

देशाच्या संविधानाचा अमृतमहोत्सव यंदा साजरा करण्यात येणार

देशाच्या संविधानाचा अमृतमहोत्सव यंदा साजरा करण्यात येणार आहे. उद्यापासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वर्षभर त्याअंतर्गत विविध कार्यक्रम होतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना या बाबतची माहिती दिली. दिल्लीतल्या संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक भव्य कार्यक्रम आयोजित केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन रिजिजू यांनी के...