August 12, 2024 8:43 AM August 12, 2024 8:43 AM
10
प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी, प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, काल छत्रपती संभाजीनगर इथं कृतज्ञता सोहोळ्यात केली. अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाच्या बुद्धविहार विपश्यना केंद्राची उभारणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी, ५० कोटी रुपये, यासह विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आल...