October 19, 2024 7:18 PM October 19, 2024 7:18 PM

views 18

काँग्रेसच्या निरीक्षकांची टिळक भवन इथं बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निरीक्षकांची बैठक टिळक भवन इथं झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, भुपेश बघेल, पृथ्वीराज चव्हाण, चरणजीत सिंग चन्नी, जी. परमेश्वर, एम बी पाटील, उत्तम कुमार रेड्डी, टी एच सिंह देव उपस्थित आहेत.

October 19, 2024 7:25 PM October 19, 2024 7:25 PM

views 14

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत, येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे, एकजुटीने भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.    त्याआधी चेन्निथला यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा के...

October 17, 2024 7:23 PM October 17, 2024 7:23 PM

views 9

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर महायुतीने २०० कोटींची उधळपट्टी केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर महायुती सरकारने २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा हे सरकार जाहिरातींवर खर्च करत असल्याचं प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

October 16, 2024 6:30 PM October 16, 2024 6:30 PM

views 9

सरकारने केलेले सर्व दावे खोटे असल्याचा पटोले यांचा आरोप

मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्राची इतर राज्यांच्या तुलनेत पिछेहाट झाली असून सरकारने वार्ताहर परिषदेत केलेले सर्व दावे खोटे असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. राज्यात होऊ घातलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात गेले, राज्यात बेरोजगारी वाढली, मुंबईतल्या मोक्याच्या जागेवरल्या जमिनी उद्योगपतींना देण्यात आल्या, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, असंही पटोले म्हणाले.

October 15, 2024 4:37 PM October 15, 2024 4:37 PM

views 9

भाजपासह इतर पक्षातील अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचे माजी आमदार धृपदराव सावळे आणि अविनाश घाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काल मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मनसेेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, उमर फारुखी, वंचित बहुजन आघाडीचे रेहमान खान, माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

October 15, 2024 3:39 PM October 15, 2024 3:39 PM

views 25

काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक

काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सह प्रभारी बी एम संदिप, यशोमती ठाकूर, उपस्थित होते.

October 15, 2024 3:29 PM October 15, 2024 3:29 PM

views 6

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वरिष्ठ निरीक्षक आणि निवडणूक समन्वयकांची नेमणूक

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणि वरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि कोकण विभागाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि डॉ. जी. परमेश्वर काम पाहतील. विदर्भासाठी भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि उमंग सिंघर, तर मराठवाड्यात सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात टी. एस. सिंगदेव आणि एम. बी. पाटील, तर उत्तर महाराष्ट्रासाठी सईद नसीर हुसेन आणि डॉ. अनसुया सीता...

October 14, 2024 7:17 PM October 14, 2024 7:17 PM

views 9

विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार – नाना पटोले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीबद्दल या बैठकीत चर्चा झाली असून महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितलं.

October 14, 2024 3:01 PM October 14, 2024 3:01 PM

views 12

विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हरियाणा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी रणनिती आखण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.

October 13, 2024 8:19 PM October 13, 2024 8:19 PM

views 7

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अग्निवीर योजनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ही योजना म्हणजे आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. नाशिक मध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात ते बोलत होते. लष्करी सेवेतल्या इतर जवानांप्रमाणे या दोघांच्या कुटुंबांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल त्यांनी केला.