November 16, 2024 6:34 PM November 16, 2024 6:34 PM

views 51

प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी BJP आणि Congress अध्यक्षांवर ECI च्या नोटिसा

महाराष्ट्र आणि झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन होत नसल्याच्या तक्रारी भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांविरोधात दाखल केल्यानंतर आज निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या. सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही पक्षांनी याबद्दल प्रतिसाद द्यावा, असं आयोगानं नोटिशीत म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी २२ मे रोजी जारी केलेल्या सूचनांचं पालन करून दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारक आणि नेत्यांनी प्रचार...

November 16, 2024 6:30 PM November 16, 2024 6:30 PM

views 18

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी असं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज शिर्डीत साकोरी इथं प्रचारसभेत बोलत होत्या. गेली १० वर्ष केंद्रात सत्तेत असूनही सरकारला लाडक्या बहिणींबाबत आताच का विचार करावासा वाटलं असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातले उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित करून राज्यात बेरोजगारी वाढीला लावण्याबाबत केंद्र तसंच राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागेल असं त्या म्हणाल्या. या सरकारनं संविधानाचं अवमूल्यन केल्याची टीका प...

November 16, 2024 6:45 PM November 16, 2024 6:45 PM

views 25

महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं प्रचारसभेत दिलं. मोदी सरकारनं देशातल्या मूठभर उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ केली, असं ते म्हणाले.    जीएसटीच्या माध्यमातून सरकार जनतेची लूट करत असून बड्या भांडवलदारांना कोट्यवधी रुपयांची सूट दिली जात आहे, अशी टीका गांधी यांनी केली.   राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव तसंच कांद्याला विशेष समिती नेमून योग्य भाव देण्यास...

November 15, 2024 6:41 PM November 15, 2024 6:41 PM

views 14

जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान

जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बाेलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनंच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, याउलट आरक्षण आणि संविधान संपवण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री आ...

November 14, 2024 6:58 PM November 14, 2024 6:58 PM

views 13

प्रधानमंत्री मोदी आणि भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला खोटी आश्वासनं दिली – मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला. इगतपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करणं, २ कोटी रोजगार निर्माण करणं इत्यादी आश्वासनं प्रधानमंत्र्यांनी दिली, पण ती पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. देशातली सर्व विकासकामं आपल्याच कार्यकाळात झाल्याचा दावा प्रधानमंत्री करतात, पण देशाच्या विकासाचा पाया माजी प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाह...

November 13, 2024 8:29 PM November 13, 2024 8:29 PM

views 19

महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची खर्गे यांची टीका

राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज लातूर इथल्या प्रचारसभेत केली. केंद्रातलं भाजपा सरकार शेतमालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे, सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली जात नाही अशी टीका खर्गे यांनी केली. सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं होतं. मात्र ते पाळलं नाही, असा आरोप करत महायुतीचं फसवं सरकार उलथून टाकून महाविकास आघाडीला विजयी करा, असं आवाहन ...

November 12, 2024 7:46 PM November 12, 2024 7:46 PM

views 10

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जाइतकी रक्कम राज्याला देण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जांच्या इतका पैसा राज्यातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना देण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. गोंदिया इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. आम्हाला अरबपतींचा नाही तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, तरुणांचा भारत हवा आहे, असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक जीएसटी गरीबांच्या खिशातून जातो, असा दावाही त्यांनी केला.    विविध समाज घटकांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत, तसंच विविध क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. हा या समुदायांचा सर्वात मोठा अपमान असल्...

November 11, 2024 7:45 PM November 11, 2024 7:45 PM

views 10

जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा महायुतीला सत्तेतून तडीपार करण्याची पटोलेंची मागणी

भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ते हिंदू-मुस्लीम मुद्दा उपस्थित करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.     भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल न बोलता ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडण...

November 11, 2024 7:56 PM November 11, 2024 7:56 PM

views 7

काँग्रेसच्या २८ पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या २८ पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून केल्याची माहिती काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली. कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यात आनंदराव गेडाम, शिलु चिमुरकर, सोनल कोेवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुर...

November 8, 2024 10:19 AM November 8, 2024 10:19 AM

views 14

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राज्याच्या विविध भागांत जाहीर सभा

महाराष्ट्र विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.   10 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचंही ते म...