January 16, 2025 2:18 PM January 16, 2025 2:18 PM

views 16

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. बवाना मतदारसंघातून सुरेंदर कुमार, करोल बागमधून राहुल धनक निवडणूक लढणार आहेत. सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून, तुघलकाबाद इथून विरेंदर बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भदाना निवडणूक लढणार आहेत. त्याआधी मंगळवारी काँग्रेसने सोळा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. काँग्रेसने आतापर्यंत ६८ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

January 9, 2025 7:12 PM January 9, 2025 7:12 PM

views 9

वस्तू आणि सेवा कराचं नवीन प्रारूप येत्या अर्थसंकल्पात लागू करावं – काँग्रेस

छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेवरचा करांचा बोजा कमी करण्यासाठी वस्तू आणि सेवा कराचं नवीन प्रारूप येत्या अर्थसंकल्पात लागू करावं अशी  मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे. मुंबईत गांधी भवन इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते.  भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण खरी परिस्थिती वेगळी आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना मात्र  वस्तुस्थिती मांडली जात होती, असं ते म्हणाले. 

December 24, 2024 6:41 PM December 24, 2024 6:41 PM

views 5

निवडणूक नियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका

निवडणूक नियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. केंद्रसरकारने निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तवेज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा  निवडणूक नियम १९६१ मध्ये केली आहे. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

December 19, 2024 7:05 PM December 19, 2024 7:05 PM

views 13

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी रालोआच्या खासदारांशी गैरवर्तन केल्याचा भाजपचा आरोप

संसदभवन परिसरात  काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी रालोआच्या खासदारांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या  दोन भाजपा खासदारांना निदर्शनादरम्यान जखमी केल्याचा आरोप केला.  याशिवाय राहूल गांधी यांनी भाजपाच्या आदिवासी खासदार फंगॉन कोन्याक यांच्याशीही वाईट वर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी राज्यसभेच्या ...

December 13, 2024 10:58 AM December 13, 2024 10:58 AM

views 8

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 21 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली आहे. पक्षाने बादली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित, बल्लीमारन मतदारसंघातून हारून युसूफ, वजीरपूरमधून रागिणी नायक, सीलमपूरमधून अब्दुल रहमान आणि सदर बाजार विधानसभा मतदारसंघातून अनिल भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे.

December 8, 2024 3:23 PM December 8, 2024 3:23 PM

views 22

निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत फेरफार – पृथ्वीराज चव्हाण

राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार निवडणूक आयोग स्‍वायत्त संस्‍था आहे, मात्र निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. अप्रत्‍यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करीत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. साताऱ्याच्या काँग्रेस भवनमध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.   निवडणूक आयोगाची स्‍वायत्तता धोक्‍यात आली असून, त्‍याची कार्यपध्‍दती आता सरकारी खात्‍याप्रमाणेच झाली आहे असं ते म्हणाले....

November 22, 2024 7:58 PM November 22, 2024 7:58 PM

views 6

नालासोपारा प्रकरणात विनोद तावडे यांचा काँग्रेसविरोधात मानहानीचा दावा

भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही सत्य सर्वांच्या समोर आहे, असं तावडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. कथित ५ कोटी रुपये निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासात कुठेच सापडले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसचं खालच्या दर्जाचं राजकारण आणि देशाला दिशाभूल करण...

November 18, 2024 1:20 PM November 18, 2024 1:20 PM

views 12

महायुतीमुळे ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

राज्यातल्या ५ लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.   धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विमानतळं, ...

November 17, 2024 7:11 PM November 17, 2024 7:11 PM

views 10

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बॉलिवुड अभिनेत्यांना दिलेल्या धमक्या इत्यादी प्रकरणांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या सगळ्याला महायुतीच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला.

November 17, 2024 7:41 PM November 17, 2024 7:41 PM

views 8

१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रबाहेर गेल्याची प्रियंका गांधींची टीका

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या.    केंद्र सरकार महत्त्वाची बंदरं, विमानतळ आणि अन्य सरकारी कंपन्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अडीच लाख रिक्त पदं असून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, युवक आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी काही करण्...