April 7, 2025 8:06 PM April 7, 2025 8:06 PM

views 5

काँग्रसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या गुजरातमध्ये होणार

काँग्रसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या गुजरातमध्ये अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात तर अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक येत्या ९ तारखेला साबरमती नदीच्या काठावर होणार आहे. काँग्रेसचे माध्यम आणि प्रसार विभागाचे अध्यक्ष पवन खेरजी यांनी आज   अहमदाबाद इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.  दे   शभरातून या बैठकांना ३ हजार प्रतिनिधींसह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतले  विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस...

April 2, 2025 7:55 PM April 2, 2025 7:55 PM

views 9

पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी

पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत असेल तर केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीच्या आश्वासनाचा महायुतीच्या नेत्यांना विसर पडल्याचं ते म्हणाले. 

March 31, 2025 1:30 PM March 31, 2025 1:30 PM

views 9

खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवण्याची काँग्रेसची मागणी

देशातल्या खासगी, बिगरअल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांमध्येही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवाव्यात यासंदर्भात सरकारनं कायदा आणावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या प्रवर्गातल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी विशेष कायदे करायचा अधिकार सरकारला देणाऱ्या राज्यघटनेतल्या कलम १५, पोटकलम १५च्या अंमलबजावणीसाठी शिक्षण, महिला, युवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या संसदीय समितीनंही नव्या कायद्याची शिफारस केल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

March 28, 2025 7:40 PM March 28, 2025 7:40 PM

views 12

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती

काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाचा भाग म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल होतील. या निरीक्षकांची बैठक आज सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

March 16, 2025 6:50 PM March 16, 2025 6:50 PM

views 33

सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं सत्ताधाऱ्यांचं कारस्थान – काँग्रेस

कोकणात सापडलेली खनिजं आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपतींना देण्याचा सरकारचा मानस आहे. उद्योगपतींना लूट करता यावी यासाठी इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांकडूनच केलं जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते आज रत्नागिरीत, पत्रकार परिषदेत बोलत होते.   कोकणातल्या सामाजिक वातावरणाचे पडसाद मुंबईत उमटतात असं सांगून 'रत्नागिरी-सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं भाजपचं काम सुरू आहे', असा आरोप त्यांनी केला. 'औरंगजेब हा क्रूर शासक होता. त...

February 25, 2025 1:24 PM February 25, 2025 1:24 PM

views 9

सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतल्याची काँग्रेसची टीका

केंद्र सरकारने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतली आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे केला. शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे सरकारची ‘सब का साथ सब’ का विकास ही घोषणा या घटकांची थट्टा करणारी आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्र सरकारने फक्त शिष्टवृत्तीत कपात केली असं नाही तर दरवर्षी शिक्षणासाठीच्या निधीत २५ टक्के निधी कमी केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.  

February 23, 2025 7:47 PM February 23, 2025 7:47 PM

views 11

काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची उद्या बैठक

काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची बैठक २४ फेब्रुवारी रोजी आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले पक्षाचे गट नेते सतेज पाटील, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन उपस्थित राहणार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी...

February 18, 2025 1:09 PM February 18, 2025 1:09 PM

views 9

मायावती यांचं राजकारण संपवण्याची वेळ आल्याची काँग्रेसची टीका

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सामाजिक चळवळी संपवल्या, त्यामुळे  आता त्यांचं राजकारण संपवण्याची वेळ आली  आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी केली. ते आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कांशिराम यांनी बहुजनांचं प्रबोधन करण्यासाठी चळवळ सुरू केली होती, त्यांच्या चळवळीचा आधार सामाजिक न्याय होता, असं उदित राज म्हणाले. देशा मुस्लीम आणि दलित समुदायाचे प्रश्न समान असून दोघांनी एकत्र येत प्रतिकार करायला हवा असंही ते म्हणाले. 

February 16, 2025 3:43 PM February 16, 2025 3:43 PM

views 9

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या वेळी बचावकार्याऐवजी सरकार आकडे लपवण्यात गुंतलं होतं असा आरोप त्यांनी केला. दुर्घटनेच्या आधी तासाभरात पंधराशेहून अधिक तिकिटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता असं त्या म्हणाल्या.  

February 15, 2025 6:29 PM February 15, 2025 6:29 PM

views 12

केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत- कन्हैया कुमार

देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत असून केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत अशी मागणी  काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसंच स्पर्धा परीक्षांमधे यश मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या खासगी शिकवण्यांचं पेव फुटलं असून सरकारने त्यांच्यावर निर्बंध घातले पाहिजेत असं ते म्हणाले. या वर्गांच्या जाहिरातींना भुलून त्यांची फी भरणारे आणि नंतर अपयश आल्यास निराश होणारे तरुण मोठ्या संख्येनं आहेत....