June 25, 2024 7:12 PM

views 37

नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक

राज्यातल्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात आज बैठक झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातले नेते या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या राज्यातल्या कामगिरीविषयी खर्गे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आणि मतदारांचे आभार मानले.

June 24, 2024 1:32 PM

views 35

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला. काँग्रेस, नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आले होते.

June 19, 2024 6:50 PM

views 8

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचे रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. रमेश कीर हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.  

June 17, 2024 8:34 PM

views 19

वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली.    राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असं खरगे यांनी जाहीर केलं.