August 27, 2024 9:54 AM August 27, 2024 9:54 AM

views 34

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं आपले नेते गुलाम मोहम्मद मीर यांना डोरू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर शेख रियाझ दोडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दोडा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रदीपकुमार भगत हे काँग्रेसचे उमेदवार असतील.

August 16, 2024 3:11 PM August 16, 2024 3:11 PM

views 36

भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

August 13, 2024 10:15 AM August 13, 2024 10:15 AM

views 10

नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला

महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून, ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या महाविकास आघाडीच्या नवनियुक्त खासदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

August 10, 2024 6:39 PM August 10, 2024 6:39 PM

views 40

लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस पक्षाच्या लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज लातूरमध्ये झाला त्यावेळी उपस्थित नेत्यांनी हा आरोप केला. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेशचेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार अमित देशमुख उपस्थित होते. देशात क्रमांक एकचा...

August 3, 2024 7:34 PM August 3, 2024 7:34 PM

views 16

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष – अतुल लोंढे

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे केली आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. नागपुरात म्हाळगीनगर आणि मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दिलं गेलं नसल्याचा दावा करत, हा कार्यक्रम भाजपाचा होता, की राज्य सरकारचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी प्रकल्पांचे काम हे जनतेने दिलेल्या कराच्या पैशांतून होते, त्यामुळेच अशा प्रकल्पांशी...

July 26, 2024 8:33 PM July 26, 2024 8:33 PM

views 39

मविआतल्या घटक पक्षांशी जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून १० जणांची समिती स्थापन

महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी जागावाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसनं १० जणांची समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चर्चा नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, आरिफ खान, सतेज पाटील करणार आहेत. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख मुंबईतल्या जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होतील.

July 20, 2024 8:37 PM July 20, 2024 8:37 PM

views 25

हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना ईडीकडून अटक

हरयाणामधले कॉँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार यांना आज सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्यावर यमुनानगर भागात अवैध खाणकाम आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांना अंबाला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालयाने १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

July 14, 2024 12:37 PM July 14, 2024 12:37 PM

views 10

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारणाऱ्या आमदारांवर कारवाईचा काँग्रेसचा इशारा

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्या पक्षातल्या आमदारांवर कारवाईचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.   विधान परिषदेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीपासूनच संबंधितांवर लक्ष होतं, आता त्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा पटोले यांनी, ट्विटरवर जारी एका चित्रफीतीतून दिला आहे.

June 25, 2024 7:12 PM June 25, 2024 7:12 PM

views 28

नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक

राज्यातल्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात आज बैठक झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातले नेते या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या राज्यातल्या कामगिरीविषयी खर्गे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आणि मतदारांचे आभार मानले.

June 24, 2024 1:32 PM June 24, 2024 1:32 PM

views 22

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला. काँग्रेस, नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आले होते.