October 23, 2024 8:48 PM October 23, 2024 8:48 PM
2
प्रधानमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यावर खटला दाखल
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसचे साहरणपुरचे खासदार इम्रान मसूद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयानं १९ गावकऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान मसूद यांनी केलेल्या वक्तव्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली होती.