January 17, 2026 7:00 PM

views 14

महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले वाद चव्हाट्यावर

महानगरपालिका निवडणूक निकालानंतर मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई महानगरपालिकेत पक्षाची कामगिरी २०१७ च्या तुलनेत वाईट झाल्याचं सांगत काँग्रेस नेत्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २०१७ मधे काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते, या निवडणुकीत काँग्रेसला २४ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत १५२ जागा लढवल्या होत्या.  काँग्रेसची मुंबई महानगरपालिका निवडणुकीतली कामगिरी ऐतिहासिकदृष्ट्या वाईट झाल्याची टीका काँग्रेस नेते भाई ज...

January 16, 2026 7:37 PM

views 17

काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धार या जोरावर काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा इथं बोलताना दिली. या निवडणुकांमधे काँग्रेसचे एकूण साडेतीनशे नगरसेवक आणि ५ शहरांमधे महापौर असतील असं ते म्हणाले.

January 6, 2026 7:20 PM

views 70

मुंबई आणि नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज ‘मिशन मुंबई’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू करणं, शाळांमध्ये योग्य व्यवस्था उपलब्ध करणं, बेस्ट बसेस वाढवणं, मुंबईकरांना चांगली आरोग्य व्यवस्था, स्वच्छ पाणी आणि हवा देणं यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. मिशन मुंबई ही केवळ निवडणुकीची घोषणा नसून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून शहराचा सर्वांगीण विकास घडवण्याचा निर्धार आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, स्वच्छता, पर्य...

January 5, 2026 3:42 PM

views 31

बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांनी पैसा आणि धाकदपटशाचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप

महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला. हे उमेदवार लोकप्रिय आहेत, म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि धाकदपटशाच्या जोरावर झालेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.     विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी हे भ्रष्ट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या संदर्भातला अहवाल मिळूनही निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाह...

December 28, 2025 7:36 PM

views 109

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे.   संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षांतली मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. राज्यातील अन्य २८ महापालिकांसा...

December 28, 2025 2:34 PM

views 41

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज – हर्षवर्धन सपकाळ

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते.   देशात आज जात, धर्म, भाषा आणि पंथावरून समाजा समाजात विभाजन केलं जात असून, सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली. अशा परिस्थितीत काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा विचार असल्याचं ते म्हणाले. राजसत्ता आण...

December 26, 2025 7:21 PM

views 91

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं.    नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष विजयी झाले, त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचं आणि टिझरचं प्रकाशनही करण्...

December 25, 2025 7:35 PM

views 100

महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी चर्चा सुरू आहे, याशिवाय कुठल्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार करू असं सपकाळ म्हणाले.    मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढेल, इतर कुणाशी युती...

December 24, 2025 3:10 PM

views 33

काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत…

मुंबई महापालिकेची निवडणुक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. पण कुठेही निम्म्या - निम्म्या जागा वाटपाची मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

December 20, 2025 3:04 PM

views 55

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व २२७ जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. मुंबई हे मोठं शहर असून देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक इथं राहतात. त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्मा-धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं, असं मत त्यांनी मांडलं...