October 12, 2025 8:12 PM October 12, 2025 8:12 PM

views 14

नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद १४ ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार असून भारतीय लष्कर या परिषदेच्या यजमानपदी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, शांती मोहिमांसाठीचे उपमहासचिव झाँ-पीएर लाक्र्वा यांच्यासह इतर मान्यवर या परिषदेत विविध सत्रांना संबोधित करतील. संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ३२ देशांचे प्रतिनिधी या तीन दिवसीय परिषदेत सहभागी होतील. संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये सर्वाधि...

April 30, 2025 1:41 PM April 30, 2025 1:41 PM

views 8

नवी दिल्लीत येत्या ३ मे पासून मध्यस्थ संघटनेच्या परिषदेचं आयोजन

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने भारताच्या महाधिवक्ता कार्यालयातर्फे पुढच्या महिन्यात ३ तारखेला नवी दिल्ली इथे मध्यस्थ संघटनेची एक परिषद आयोजित केली जात आहे. या परिषदेत मध्यस्थ तसंच मध्यस्थ संस्थांना एकत्र आणून मध्यस्थी प्रक्रिये संदर्भातल्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा होणार आहे, अशी माहिती महाधिवक्ता आर. वेंकटरमणी यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली.

March 15, 2025 2:15 PM March 15, 2025 2:15 PM

views 18

वेव्हज् परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू

वेव्हज् अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू होत आहे. विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्हज् उपलब्ध करून देणार आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेव्हजचं आयोजन करण्यात आलं आहे.

February 24, 2025 1:42 PM February 24, 2025 1:42 PM

views 28

महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू

‘शांतीरक्षक महिलाः विकसनशील राष्ट्रांचा दृष्टीकोन’ या विषयावरील महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत होत आहे. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विकसनशील राष्ट्राच्या ३५ शांतीसेनेच्या तुकड्यांचा सहभाग असेल. परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचं बीजभाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कार्यविभागाचे महासचिव जीन पियरे लॅक्रोइक्स आणि संयुक्त राष्ट्र...