June 19, 2025 2:53 PM

views 18

क्रोएशियाच्या दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया इथून मायदेशी परतले. प्रधानमंत्री मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच  दौरा होता. त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला.     प्रधानमंत्री मोदी यांनी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेन्कोविच यांच्याशी प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक शांतता, लोकशाही मूल्य, व्यापार, तंत्र...