July 12, 2024 9:39 AM July 12, 2024 9:39 AM
3
यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर
यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर झाला आहे. येत्या 20 जुलै रोजी इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या हस्ते भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.