August 29, 2024 7:48 PM August 29, 2024 7:48 PM
13
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहचले
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहोचले आहेत. भारत श्रीलंका आम मालदीव्ज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु झालेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या तयारीचा ते आढावा घेतील. दहशतवादाचा सामना करण्यासाठी, पोलीस, कायदा अंमलबजावणी आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात क्षमतावाढ या विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची सहावी बैठक गेल्या डिसेंबरमधे मॉरिशस मधे झाली होती.