August 22, 2025 1:31 PM August 22, 2025 1:31 PM

views 18

कोलंबियात झालेल्या २ हल्ल्यात किमान १८ लोकांचा मृत्यू

कोलंबियात झालेल्या २ हल्ल्यात किमान १८ लोकांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोलंबियन एरोस्पेस फोर्सच्या तळाजवळ एका स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. कोलंबियाचे अध्यक्ष गस्टाव पेत्रोने यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यात कोलंबियाच्या क्रांतिकारी सशस्त्र दलांच्या (एफऐआरसी) गटांचा हात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरु आहे.

May 31, 2025 1:52 PM May 31, 2025 1:52 PM

views 16

दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा

काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. 

January 27, 2025 1:45 PM January 27, 2025 1:45 PM

views 10

कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा अमेरिकेचा निर्णय

कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेतून येणाऱ्या निर्वासितांच्या विमानांना कोलंबियात उतरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सहमती दिल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं व्हाईट हाऊसतर्फे जारी झालेल्या निवेदनात म्हटलं आहे. पेट्रो यांनी अमेरिकेहून येणाऱ्या निर्वासितांच्या स्थलांतराला विरोध केला होता. प्रत्युत्तरादाखल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लादलं आणि आगामी काळात ते ५० टक्के करण्याचा इशारा दिला. त्यामुळे दोन्ही देशांमधल्या...