May 19, 2025 7:28 PM May 19, 2025 7:28 PM

views 3

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी अकरावीच्या  ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये  विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल.   २० मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. प्रवेशासाठी  अंतिम  अर्ज २१ मे ते २८ मे  या कालावधीत भरता येतील. विद्यार्थी कमीतकमी १ आणि जास्तीतजास्त १० महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. ...