August 12, 2025 7:39 PM
28
कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
पुढचा आठवडाभर कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.