January 11, 2026 1:33 PM
28
दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट
दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाटेचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ओडिशातही थंडीची लाट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढल्या दोन दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड इथं दाट धुक्याची शक्यता आहे, तर तामिळनाडू. पुद्दुचेरी आणि कारिकल इथं काही ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.