December 9, 2025 7:31 PM

views 35

राज्यात गारठा वाढला!

राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज ५ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही पुन्हा थंडी वाढली असून आज सकाळी ९ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, अहिल्यानगरमध्ये ७ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातल्या सर्व...

November 10, 2025 3:01 PM

views 54

राज्यात थंडीची चाहूल

राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यांत हंगामातल्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या हवेतली आर्द्रता कमी झाली असून गारवा वाढला आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली असून वातावरण आल्हाददायक झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिक शहरातही दररोज तापमानाचा पारा घसरत असून आज सकाळी १० पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून आज सकाळी ८ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती ...

November 29, 2024 3:41 PM

views 26

राज्यात थंडीचा कडाका सुरू

राज्यात थंडीची कडाका वाढत असून बऱ्याचं ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी ८ अंंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.   अमरावती शहरात देखील पारा १२ अंश सेल्सिअस पर्यंत तर धारणी-चिखलदऱ्यात पहाटे पारा ९ अं.से. पर्यंत घसरलाय. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.