November 14, 2024 3:44 PM November 14, 2024 3:44 PM

views 80

आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधासभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. बांगर यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याने केला आहे.  याच भागातल्या वाकोडी गावात काल मविआचे उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या वाहनांवर दगडफेक करणं तसंच कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या तक्रारीवरून आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

November 13, 2024 8:06 PM November 13, 2024 8:06 PM

views 8

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून  ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून  विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुलनेत ही किंमत ६३ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. तर २०१४च्या तुलनेत यात जवळपास सात पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.   या कालावधीत सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५ हजार ९०२ तक्रारी प्राप्त झाल्या...

November 6, 2024 7:32 PM November 6, 2024 7:32 PM

views 18

आचारसंहिता लागू झाल्यापासून रत्नागिरीत ६६ गुन्हे दाखल, ५१ आरोपी अटक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल केले असून ५१ आरोपींना अटक केली आहे. यात १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा आणि २७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या मालाचं एकूण मूल्य १ कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी सांगितलं. ४ पथकांद्वारे महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

October 30, 2024 3:07 PM October 30, 2024 3:07 PM

views 12

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर एकूण १ हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातल्या १ हजार ६४६ तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाते.

October 18, 2024 3:21 PM October 18, 2024 3:21 PM

views 14

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात कुठंही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सज्ज आहे. रायगडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली.या कारवाईत एकूण २ लाख ७१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.