September 14, 2024 1:49 PM September 14, 2024 1:49 PM

views 8

सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या ड्रेजरचं भूमिपूजन

केंद्रीय बंदर, जहाज  और जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज कोचीन शिपयार्ड मध्ये देशातल्या सर्वात मोठ्या ड्रेजरचं भूमिपूजन दूरस्थ पद्धतीनं झालं.   यामुळे  भारताच्या सागरी सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.  ड्रेजर मशीनच्या सहाय्यानं नदी, नाले , बंदरं यांची खोली वाढवता येते. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सोनोवाल म्हणाले.