October 14, 2024 11:04 AM October 14, 2024 11:04 AM

views 13

गुजरातमधून 518किलोग्राम कोकेन जप्त

केंद्र सरकारच्या अमली पदार्थ आणि नशा मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत, दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि गुजरात पोलिसांनी गुजरातमधून 518 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका औषध कंपनीतून जप्त केलेल्या या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे.   चौकशीदरम्यान, जप्त केलेली औषधं गुजरातमधील अंकलेश्वर इथून आल्याचं उघड झालं होतं. दरम्यान, आसामच्या करीमगंज जिल्ह्यात, पोलिसांनी मिझोरामकडून आलेल्या वाहनातून अंदाजे साडे चार कोटींचे अंमली पदार्थ, जिल्हा पोलिसांनी जप्त...

October 11, 2024 1:48 PM October 11, 2024 1:48 PM

views 9

दिल्लीत दोन हजार कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन हजार कोटी रुपये किमतीचं २०० किलो कोकेन जप्त केलं आहे. पश्चिम दिल्लीतल्या रमेश नगर परिसरातून हे कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात ५०० किलो कोकेन जप्त केलं होतं. पोलिसांनी या सर्व प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे.