September 22, 2024 3:25 PM September 22, 2024 3:25 PM
9
कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांचा विरोध
सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बेलापूर जेट्टीजवळ नागरिकांनी आज मानवी साखळी करत आंदोलन केलं. वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई महापालिकेनं बेलापूरचा विकास केला, असं असताना सिडकोतर्फे कोस्टल रोडसाठी या भागात आखणी केल्याच्या विरोधात नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/09/ि्.mp4"][/video]