March 5, 2025 3:36 PM March 5, 2025 3:36 PM
12
देशात १६ कोटी ७० लाख टनांपेक्षा जास्त कोळसा उत्पादन
देशातल्या खाण क्षेत्रात चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत १६ कोटी ७० लाख टनापेक्षा जास्त कोळसा उत्पादन झाल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा १२ कोटी ६० लाख टन इतका होता. वीज, पोलाद आणि सिमेंटसारख्या क्षेत्रांना अखंड कोळसा पुरवठा होत आहे. हा पुरवठा अखंड राहावा आणि या क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.