March 27, 2025 9:30 AM March 27, 2025 9:30 AM

views 9

आज कोळसा खाणींचा लिलाव 

  केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्यावतीने आज कोळसा खाणींच्या लिलावांचा 12 वा टप्पा सुरू करणार आहे. यामध्ये लिलावासाठी प्रस्तावित 13 कोळसाखाणी पूर्णतः आणि 12 खाणी अंशतःशोधून काढण्यात आल्या आहेत.   या लिलावाचा उद्देश देशी तसच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला अधिक बळ मिळवून देण हा आहे. 

November 26, 2024 7:32 PM November 26, 2024 7:32 PM

views 5

कोळसा मंत्रालयाचे दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय

कोळसा मंत्रालयानं कोळसा धारण क्षेत्र अधिग्रहण आणि विकास दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय मागवले आहेत. या विधेयका संदर्भात प्रस्तावित सुधारणा कोळसा मंत्रालयाच्या coal.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 

September 10, 2024 10:02 AM September 10, 2024 10:02 AM

views 10

कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या समाजिक जबाबदारी उपक्रमांचा सहामाही आढावा घेण्यासाठी बैठक

कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या समाजिक जबाबदारी उपक्रमांचा सहामाही आढावा घेण्यासाठी काल कोळसा मंत्रालयातर्फे नवी दिल्ली इथं एक बैठक घेण्यात आली. या उपक्रमांचा समुदायांवर पडणारा त्यांचा प्रभाव आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगतता या मुद्यांवर त्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यात आलं. आरोग्यसेवा, शिक्षण, पर्यावरण, कौशल्य विकास आणि उपजीविका यांसारख्या क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. कोळसा खाणींच्या क्षेत्रात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या राहणीमानाचा द...

July 18, 2024 8:20 PM July 18, 2024 8:20 PM

views 8

जगातल्या पाच मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी भारतात – कोळसा मंत्रालय

जगातल्या पाच सर्वात मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी भारतात असल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेवरा आणि कुसमुंडा या दोन खाणी जगातल्या सर्वात मोठ्या कोळसा खाणींमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असून, त्या कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात आहेत. या दोन खाणी एकत्रितपणे वर्षाला १०० दशलक्ष टन पेक्षा जास्त कोळसा उत्पादन करत असून भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या ते १० टक्के इतकं आहे.