March 12, 2025 1:18 PM March 12, 2025 1:18 PM
6
अवैध कोळसाखाणी बंद करण्याची जबाबदारी राज्यसरकारांची – केंद्र सरकार
अवैध कोळसाखाणी बंद करण्याची जबाबदारी राज्यसरकारांची असल्याचं आज केंद्रसरकारनं लोकसभेत सांगितलं. आसाममधे रॅटहोल कोळसाखाणींमधे झालेल्या अपघातात कामगारांचा मृत्यू झाल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कोळसामंत्री जी किशन रेड्डी उत्तर देत होते. या संदर्भात आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याशी चर्चा केली असून एकूणच कोळसाखाणींमधे अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रसरकार राज्यसरकारांशी संपर्कात आहे, असं ते म्हणाले. कोळसाखाणींमधली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, झारखंड मधे बे...