August 20, 2025 1:40 PM August 20, 2025 1:40 PM

views 1

जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज सकाळी सुरु असलेल्या  जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला. या आरोपीला पकडण्यात आलं असून, त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान रेखा गुप्ता यांची प्रकृती स्थिर असल्याचं दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षानं या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनीही या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा तसंच आदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र कोणालाही हिंसा करण्याचा अधिकार नसल्याचं आतिषी य...

March 8, 2025 8:42 PM March 8, 2025 8:42 PM

views 13

महिला समृद्धी योजनेला संमती दिल्याची दिल्ली सरकारची घोषणा

दिल्ली सरकारनं आज महिला समृद्धी योजनेला संमती दिल्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री ऱेखा गुप्ता यांनी केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच याकरता नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

February 24, 2025 1:37 PM February 24, 2025 1:37 PM

views 5

दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात

नव्यानं स्थापन झालेल्या दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री परवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रविंद्र इंद्राज सिंग आणि पंकज सिंग यांच्यासह सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी सर्वांना शपथ दिली. आज दुपारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक  होणार आहे.    नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना सभागृहाला उद्या संबोधित करणार आहेत. मागच्या सरकारच्या कार्यपद्धतीचा अहवाल उद्याच सादर केला...