June 21, 2025 8:03 PM June 21, 2025 8:03 PM
22
देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंडकडून जाहीर
देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंड सरकारनं आज जाहीर केलं. २०३० पर्यंत राज्यात ५ नवीन मोठी योग केंद्र स्थापन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तसंच पुढच्यावर्षीच्या मार्चपर्यंत सर्व आयुष आरोग्य केंद्रात योग सुविधा उपलब्ध केल्या जातील. याशिवाय योग आणि ध्यान केंद्र विकसित करण्यासाठी राज्य सरकार २० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे. योग, ध्यान, निसर्गोपचार या क्षेत्रात संशोधनासाठी सरकार १० लाख रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे. हे धोरण उत्तराखंडला योग आणि आरोग्य कल्याण क्षेत्रात जागतिक राजधानी म्...