October 6, 2025 1:33 PM October 6, 2025 1:33 PM
14
Bihar: मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी हस्तांतरित
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत २१ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी हस्तांतरित केला. एकवीसशे कोटी रुपयांचं हे हस्तांतरण म्हणजे या योजनेचा तिसरा टप्पा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २६ सप्टेंबरला या योजनेचं उदघाटन केलं होतं. महिलावर्गात उद्योजकता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी बिहारमधल्या १ कोटी १० लाख महिलांची निवड झा...