December 5, 2024 3:20 PM December 5, 2024 3:20 PM

views 21

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. रांची इथं राजभवनात झालेल्या समारंभात झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चाचे ६, काँग्रेसचे चार तर राष्ट्रीय जनता दलाचा एक असे हे मंत्रिमंडळातले ११ मंत्री आहेत.

July 4, 2024 8:09 PM July 4, 2024 8:09 PM

views 7

हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयानं सोरेन यांना जामीन दिल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला होता.