November 26, 2025 7:12 PM November 26, 2025 7:12 PM

IITच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बेचं काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली.    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. याप्रकरणावरुन ते बोलत होते.