August 12, 2024 8:43 AM August 12, 2024 8:43 AM

views 11

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी, प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, काल छत्रपती संभाजीनगर इथं कृतज्ञता सोहोळ्यात केली. अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाच्या बुद्धविहार विपश्यना केंद्राची उभारणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी, ५० कोटी रुपये, यासह विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आल...

August 11, 2024 8:55 AM August 11, 2024 8:55 AM

views 1

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी २५ कोटींचा आराखडा

कोल्हापूर इथं आगीत नष्ट झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. हे नाट्यगृह वर्षभरात पुन्हा उभारण्याची ग्वाही देताना त्यांनी त्यासाठी २५ कोटींचा आराखडा केला असल्याचं पाहणीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरी समिती नियुक्त केली आहे. समितीचा अहवाल आणि तपासाअंती नेमकं काय झालं ते निष्पन्न होईल, निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.        

August 9, 2024 8:19 PM August 9, 2024 8:19 PM

views 7

हर घर तिरंगा अभियानाला राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रारंभ झाला. लाखो स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या त्‍याग आणि बलिदानातून देशाला स्‍वातंत्र्य मिळालं. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव तरुणांना व्हावी आणि त्‍यांच्‍यात राष्‍ट्रीयत्‍वाची भावना रूजावी, यासाठी 'घरोघरी तिरंगा अभियान' प्रेरणादायी ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिं...

August 9, 2024 10:37 AM August 9, 2024 10:37 AM

views 12

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे-नाशिक, आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.   दरम्यान गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गार्वरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. या संबंधीचं निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी गडकरी यांना दिलं होतं.

August 8, 2024 3:48 PM August 8, 2024 3:48 PM

views 6

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थी, अभियंत्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा

बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी आणि अभियंत्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना मायदेशी परत आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन जयशंकर यांनी यावेळी दिलं. या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

August 7, 2024 8:34 PM August 7, 2024 8:34 PM

views 38

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातल्या अल्पसंख्यंकांच्या उन्नती करता टार्टी, बार्टी, महाज्योतीच्या धरतीवर मार्टी अर्थात अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थेसाठी एकूण ११ पदं निर्माण केली जातील. तसंच प्रशासनिक खर्चासाठी ६ कोटी २५ लाख रुपये खर्चासाठी मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली  यात शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांचा प्रामुख्यानं समावेश करण्यात आला आहे. तसंच वैनगंगा आणि नळगं...

August 6, 2024 7:09 PM August 6, 2024 7:09 PM

views 6

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.  बांगलादेशातल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयानं तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.   यासाठी बांगलादेशात असलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली असून, तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासा...

August 6, 2024 8:47 AM August 6, 2024 8:47 AM

views 7

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, तसंच...

August 5, 2024 7:47 PM August 5, 2024 7:47 PM

views 6

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे, असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारनं कोणती योजना तयार करावी किंवा ती प्राधान्यानं राबवावी ही बाब न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात...

August 4, 2024 7:08 PM August 4, 2024 7:08 PM

views 10

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातला विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाला, तर नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार ना...