September 11, 2024 3:14 PM September 11, 2024 3:14 PM

views 9

राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभेतले विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची, आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना आणि महायुतीतले सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून, आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.   तर, राहुल गांधी नेहमीच देशविरोधी विधानं करत असतात. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी र...

September 11, 2024 9:07 AM September 11, 2024 9:07 AM

views 6

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि, हा लाभ मिळाला नसेल, तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल, असं शिंदे यांनी सांगितलं.

September 10, 2024 6:48 PM September 10, 2024 6:48 PM

views 6

राज्यात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात  लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राज्यात महायुतीला विजयी करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून तो मिळालेला नसल्यास याबाबतच्या अडचणी दूर करेल, त्या कुटुंबाला मार्गदर्शन करेल, माहिती देईल, असं शिंदे यांनी ठाण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

September 9, 2024 6:58 PM September 9, 2024 6:58 PM

views 9

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारं शुल्क योग्य असावं तसंच प्रकल्पाच्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव बैठकीसमोर सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मिहान परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेली व्यापारी संकुलं ही...

September 9, 2024 3:33 PM September 9, 2024 3:33 PM

views 21

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि इतर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली. गृहमंत्री...

September 8, 2024 7:03 PM September 8, 2024 7:03 PM

views 8

राज्य सरकारनं जनहिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळं त्यांची फारशी चर्चा होत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.   देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ...

September 6, 2024 7:20 PM September 6, 2024 7:20 PM

views 13

एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. नागपूरमधे ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही, असंही त्...

September 5, 2024 7:26 PM September 5, 2024 7:26 PM

views 7

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या ८ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली.

September 5, 2024 8:29 PM September 5, 2024 8:29 PM

views 12

२९ हजार रोजगार निर्माण करणाऱ्या ४ औद्योगिक प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

राज्यात १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.   सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार आहे. एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.   पुण्यातल्या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्...

September 5, 2024 8:30 PM September 5, 2024 8:30 PM

views 11

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३०७ कोटी रुपयांचा निधी द्यायला मान्यता

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून ३०७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करायला राज्यशासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णयही आज जारी केला आहे. शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळती करु नये, याची काळजी घेण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.