October 8, 2024 8:11 PM October 8, 2024 8:11 PM

views 10

हरयाणामध्ये जातीय वादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला – मुख्यमंत्री शिंदे

हरयाणामधे जातीय वादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. तिथल्या जनतेनं डबल इंजिन सरकारवर विश्वास व्यक्त केला असून, या यशाचं निर्विवाद श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना जातं, असं त्यांनी म्हटलय.    हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विकासाला महत्व दिल्याच दिसून आलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. काँग्रे...

October 7, 2024 7:40 PM October 7, 2024 7:40 PM

views 13

राज्यात १० टक्के नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचं प्रतिपादन

राज्यात माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात यश आलं आहे.  २०१३ च्या तुलनेत सध्या राज्यात केवळ १० टक्के नक्षलवादी शिल्लक असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. प्रथमच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाला असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी राज्यातल्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली.    नक्षलग्रस्त भागातल्य...

October 5, 2024 9:05 PM October 5, 2024 9:05 PM

views 15

लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळं आपलं सरकारं हे लाडकं सरकार झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमीच राज्याला भरभरून देतात आणि आमच्याकडून काम करुन घेतात, असं ते म्हणाले. आज दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्याचा आहे. यामुळं खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

October 4, 2024 8:09 PM October 4, 2024 8:09 PM

views 10

तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन’म्हणून साजरा हाेणार

तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तमाम मराठी भाषिकांना आनंद झाला आहे. तसंच मराठी भाषेच्या ...

October 1, 2024 6:56 PM October 1, 2024 6:56 PM

views 10

टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या सांगली जिल्ह्यातल्या तीन घटक कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या, सांगली जिल्ह्यातल्या तीन घटक कामांचं भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं. या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या टप्पा क्रमांक ६, पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक ५ वितरण व्यवस्था, आणि कामथ गुरूत्व नलिका, यांचा समावेश आहे.    या कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र...

October 1, 2024 3:06 PM October 1, 2024 3:06 PM

views 15

नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. लैंगिक छळ प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरीक्त उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

September 29, 2024 3:46 PM September 29, 2024 3:46 PM

views 10

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातल्या विविध कामांचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुद्देशिय कृषी संकुलाचं उद्घाटन  आणि  नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या पाणी योजनेचं भूमीपूजन याचा यात समावेश आहे. त्यानंतर नाडे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. मल्हारपेठ इथं ग्रामसचिवालयाचे नुतनीकरण आणि नामकरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. पाटणमधल्या दौलतनगर मरळी इथल्या विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमीपूजन आण...

September 25, 2024 8:23 PM September 25, 2024 8:23 PM

views 13

सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूकीमुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य झालं आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं जाळं तया...

September 23, 2024 2:17 PM September 23, 2024 2:17 PM

views 8

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर  जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक विशेषत: मुंबईतल्या काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहीती आहे.

September 22, 2024 8:36 PM September 22, 2024 8:36 PM

views 12

नवी मुंबईत कोळी बांधवांनी बांधलेल्या घरांबाबत लवकरच अधिसूचना जारी होणार – मुख्यमंत्री शिंदे

नवी मुंबईत कोळी बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली इथं उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोळी भवनाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. कोळी बांधव हे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले. राज्यात जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवांच अस्तित्व नाकारलं जाणार नाही, असं आश्वास...