November 10, 2024 7:17 PM November 10, 2024 7:17 PM

views 9

मविआचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची मुख्यंमत्र्यांची टीका

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची टीका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे इथं आज त्यांनी प्रचारासाठी रॅली काढली, तेव्हा ते बातमीदारांशी बोलत होते. महायुतीनं ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केली, तेव्हा पैसे कुठून आणणार असं म्हणत आमच्याविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्यांनी आता आमच्या योजना चोरून आता ते खोटी आश्वासनं देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

November 8, 2024 7:40 PM November 8, 2024 7:40 PM

views 11

महायुती सत्तेत आल्यावर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन मांडत काम करणार – मुख्यमंत्री

राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धारशिव इथल्या प्रचार सभेत सांगितलं. महायुतीचे धाराशिवचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखत महागाई आटोक्यात ठेवू, २५ लाख रोजगार निर्मिती करू आणि लाडक्या बहिणींना एकवीशसे रुपयांच्या मदतीचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

November 8, 2024 2:35 PM November 8, 2024 2:35 PM

views 16

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका

माझी लाडकी बहीण, माझा लाडका शेतकरी  या योजना महायुती सरकारने आणल्या. परंतु काँग्रेसच्या सरकारने कर्नाटक, राजस्थान येथे अशा  योजनांची आश्वासनं पूर्ण केली नाहीत, हे सर्वांना माहीत आहे, असं लोक जाणतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर मधे सांगितलं.

November 7, 2024 7:04 PM November 7, 2024 7:04 PM

views 25

…म्हणून विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी खटले दाखल केले. परंतु याचा फटका आपल्यालाच बसेल हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता हे विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात वाडेगाव इथं महायुतीच्या प्रचार सभेत  बोलत होते.   राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असा विश्वास शिंदे व्यक्त  करत  सत्तेत आळ्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात दर...

October 20, 2024 10:35 AM October 20, 2024 10:35 AM

views 13

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

October 14, 2024 6:31 PM October 14, 2024 6:31 PM

views 10

राज्य सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून आपल्या सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना त्यांच्या हस्ते आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.   शालेय शिक्षणंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपलं सरकार फक्त बोलणारं नाही, तर काम करून दाखवणारं आहे, असं सांगून मुख्यमंत्री माझी ला...

October 13, 2024 7:13 PM October 13, 2024 7:13 PM

views 11

लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

माझी लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातले १७ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचले आहेत. असं ते म्हणाले. आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिल्याचा उल्लेख करत लाडक्या बहिणींनी साथ दिली तर या योजनेतून दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होईल अशी हमीसुद्धा ...

October 11, 2024 7:10 PM October 11, 2024 7:10 PM

views 14

सिडकोच्या आणि नवी मुंबई पालिकेच्या विविध नागरी सुविधा, प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 सिडकोच्या आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या  विविध नागरी सुविधा, प्रकल्पांचं लोकार्पण अणि महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी इथल्या सिडको प्रदर्शन केंद्रात झालं. राज्यभरात असलेल्या सिडकोच्या मालकीच्या जमीनी मोकळ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत असतील तर त्या दूर करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.   पनवेल महापालिकेचा शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं तसंच महापालिकेच्या परिवह...

October 11, 2024 3:04 PM October 11, 2024 3:04 PM

views 10

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.   भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आज धावपट्टीची चाचणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय वि...

October 10, 2024 4:06 PM October 10, 2024 4:06 PM

views 7

शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळं स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारनं आज शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळं स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यासह मदरश्यांमधल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करायलाही राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.   राज्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू करणं, तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता देणं, कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाव...